अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री

नवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणात आता ज्याने धडक दिली त्या वाहनचालकाने अपघातग्रस्ताला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यास त्याच्या शिक्षेत कपात करण्यात येणार आहे. पण धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा देण्यात येईल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले.

गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते.

नव्या विधेयकांमधील महत्त्वाचे मुद्दे…
संघटित गुन्हेगारीची व्याख्या : संघटित गुन्हेगारीमध्ये सायबर गुन्हे, लोकांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांचा समावेश केल्याने पोलिस आणि न्यायव्यवस्थेला तपास करण्यास सोपे जाणार आहे.

नवीन कलमे : नव्याने आणण्यात आलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ४८४ ऐवजी ५३३ कलमे आहेत. नऊ कलमे वाढविण्यात आली, तर १७७ कलमांमध्ये बदल करण्यात आला. ३९ उपकलमांचा समावेश केला असून ४४ नव्या तरतुदी आहेत.

बलात्कार प्रकरण : यापुढे बलात्कार प्रकरणात न्यायवैद्यक शाळेच्या अहवालाला प्रमुख स्थान असणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास केला जाईल.

पीडितांना म्हणणे मांडण्याचा अधिकार : भारतीय न्यायसंहितेने सुनावणीदरम्यान पीडितांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. तसेच शून्य एफआयआर पीडिताची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मागे घेता येणार नाही.

जामीन मिळणार : सुनावणी सुरू असतानाच आरोपीने जर एक तृतीयांश काळ तुरुंगात काढला असेल तर तो किंवा ती जामीन मिळण्यास पात्र ठरणार.

राजद्रोहाचा कायदा रद्द : ब्रिटिशकाळात आणला गेलेला राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात डांबण्यासाठी हे कलम ब्रिटिशांनी वापरले होते. त्याऐवजी आता देशद्रोहाचे कलम समाविष्ट केले आहे.

राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री

…तर पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करणार: गृहमंत्री

संसदेत कसे घुसले? चौकशीत आलं समोर; गुन्हा दाखल…

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!