मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…

पुणे (संदीप कद्रे): रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या योगेश उर्फ सॅम सोनवणे व त्याच्या साथीदारावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९४ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

फिर्यादी महिला त्यांच्या कार्यालयाच्या समोरुन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले होते. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख योगेश उर्फ सॅम जगदिश सोनवणे (वय 23) व राहुल मच्छिंद्र कांबळे (वय 24) या दोघांना अटक करुन गुन्ह्यातील मंगळसुत्र व गुन्हा करताना वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. आरोपींनी ही दुचाकी कोथरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ९५वी कारवाई आहे.

मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…

मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!