
आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचा जिल्ह्यस्तरीय सन्मान…
पुणे (कैलास गायकवाड) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचा जिल्ह्यात उत्कृष्ठ पोलिस ठाणे म्हणुन कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पुणे येथील जिल्हा ग्रामीण पोलिस मुख्यालयात शुक्रवारी (ता. २७) झालेल्या विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल उपस्थित होते. गेल्या वर्षभरात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हे नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था व लोकाभिमुख सेवा याबाबत उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून उत्कृष्ठ पोलिस ठाणे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
View this post on Instagram
गुन्ह्यांचा तपास, रस्त्याच्या कडेला धोकादायकरित्या कठडे नसलेल्या विहिरींना संरक्षक कठडे बसवले, सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तक्रार घेऊन येणाऱ्या गरिबांना जेवणाची व्यवस्था, आदिवासी तसेच गरीब कुटुंबाना दिवाळी फराळ वाटप तसेच महिलांना साडी वाटप असे उपक्रम राबवले, जेष्ठ नागरिकांचे मेळावे घेऊन चोरीच्या घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत जनजागृती केली. तसेच वेळप्रसंगी गरीब कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी कधी शेळी घेऊन दिली तर कधी स्वयंपाकासाठी सिंलेडरची मदत केली. सायबर गुन्ह्यांच्या बाबत मार्गदर्शन केले अशा प्रकारे अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. आपण करत असलेल्या सेवेतून सामाजिक वसा जपलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
जुन्नर तालुक्यात घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…
पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई…
Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…

