
पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! जामिनावर सुटलेल्या मंदार किवळेला का मारलं…
पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या गेटजवळ भरदिवसा एकावर गोळीबार आणि कोयत्यानं वार करून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच ते सात जणांनी केलेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव मंदार किवळे असल्याची माहिती समोर आली आहे. मंदार किवळे याची चार दिवसापूर्वीच जामिनावर सुटका झाली होती. या हत्येनंतर एकाच खळबळ उडाली.
कात्रज येथील संतोषनगर परिसरात जागेच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमर दिलीप साकोरे (वय ४०) याच्यासह मंदार मारुती किवळे (वय ३५), गिरीश सुभाष बाबरे (वय २५) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय ३५) या चौघांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शुभम चव्हाण आणि मुख्य आरोपी अमर साकोरे यांच्यात एका जागेवरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी पहाटे शुभम कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्यावेळी अमर साकोरे आणि मंदार किवळेसह त्याच्या इतर साथीदारांनी शुभमला अडवून शिवीगाळ व मारहाण सुरू केली. आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम पळाला असता, आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्याला बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता.
View this post on Instagram
या खून प्रकरणानंतर आंबेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कामठी बु. येथे छापा टाकून मंदार किवळेसह चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. याच प्रकरणात पुढे मंदार किवळे जामिनावर बाहेर आला होता. शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्यात मंदारचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि बदल्याच्या भावनेतूनच झाला का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली असून तपासासाठी पथके रवाना केली आहेत.
दरम्यान, मंदार किवळे हा शुभम चव्हाण हत्याप्रकरणातील आरोपी आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो तुरुंगात होता. दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. आज (बुधवार) त्याची कोर्टात पहिली हजेरी होती. त्यासाठी मंदार न्यायालयात आला असताना त्याच्यावर हल्ला झाल्याचे मंदार किवळेच्या वकिलांनी सांगितले.
पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचे हात तोडले, बंदूक टाकून आरोपी फरार…
पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…
पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार…

