
पुणे! हिंजवडी IT हबमध्ये प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट; कारण समोर…
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरासह आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कोमल राजेंद्र डहाके (वय 27, मूळ रा. वर्धा, सध्या रा. साखरे पीजी, हिंजवडी) असे मृत युवतीचे नाव आहे. ती विप्रो (Wipro) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. या प्रकरणी तिचा इन्फोसिस (Infosys) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रेमसंबंध, लग्नाला दोन्ही कुटुंबीयांची संमती होती. मात्र याच प्रेमसंबंधांचा शेवट रक्तरंजित झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांच्या लग्नालाही दोन्ही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात संशयाने प्रवेश केला होता. शुभमचे बाहेर कुठेतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार किरकोळ वाद होत होते. दरम्यान, घटनेच्या रात्रीही दोघांमध्ये याच कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, शुभमने कोमलला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
View this post on Instagram
आरोपी शुभमने कोमलच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कोमल गंभीर जखमी झाली. ती बेशुद्ध पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र, या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभम तिच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभमने स्वतः पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. आपण आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
या फोननंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीजीमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांसमोर भयावह चित्र होते. कोमल निपचित अवस्थेत पडलेली होती. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपी शुभम ज्ञानेश्वर कालबांडे याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पुणे! Wipro कंपनीतील IT इंजिनिअर युवतीचा खून; Infosys मधील प्रियकराला अटक…
पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…
पुणे! पायलच्या लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज…
पुणे! आयटी इंजिनीअरने पत्नीला संपवलं अन् मारली गॅलरीतून उडी…
स्वारगेट अत्याचार प्रकरण! पीडित युवतीला सुनावणीवेळी रडली ढसाढसा…

