
राज्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक श्रेणीत पदोन्नती…
मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे या राज्यातील दोन वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक (DGP) श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय २० नोव्हेंबरला जारी करण्यात आला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना राज्य शासनाने त्यांची सध्याची पदस्थापना कायम ठेवली आहे. पदोन्नती जरी झालेली असली तरी आशुतोष डुंबरे आणि देवेन भारती सध्याच्या त्यांच्या जागीच काम करतील.
View this post on Instagram
देवेन भारती यांच्याविषयी…
– देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत.
– मूळचे बिहारमधील दरभंगा येथील असलेल्या भारती यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे
– देवेन भारती यांनी महाराष्ट्र पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
– मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाचा ते भाग होते
– पत्रकार जे.डे हत्या प्रकरणाच्या तपासात त्यांचा सहभाग होता
– इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे जाळे मोडून काढण्याच्या कारवायांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली
– देवेन भारती यांनी यापूर्वी सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), अतिरिक्त पोलीस महासंचालक (दहशतवाद विरोधी पथक) आणि महाराष्ट्र राज्य – सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांसारख्या महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत
– त्यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), महाराष्ट्र एटीएस (ATS) प्रमुख आणि मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशी पदे सांभाळली आहेत
आशुतोष डुंबरे यांच्याविषयी…
– आशुतोष डुंबरे हे महाराष्ट्र केडरचे १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत
– सध्या ते ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत. शासनाने त्यांना पोलीस महासंचालक दर्जाची पदोन्नती दिली आहे
– त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला, त्यांनी उत्पादन अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे
– राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, मुंबईचे सह पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि ठाण्याचे सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे
– त्यांना २०१० मध्ये ‘इंडियन पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ आणि २०२१ मध्ये ‘प्रेसिडेंट्स पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस’ प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…
महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…
Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…
जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…
जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…

