
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतींसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय…
मुंबई: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली म्हणून आता युवतींची संधी हुकणार नाही. अशा युवतींना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घोषणा केली आहे.
पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पण ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली आणि पोटात कळा सुरू झाल्या, कंबरदुखी किंवा अशक्तपणामुळे धावता आलं नाही, तर मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती अनेक मुलींना असते. मात्र, आता अशा तरुणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
View this post on Instagram
मासिक पाळीच्या काळात काही तरुणींना तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत 100 मीटर आणि 800 मीटर धावणं, गोळाफेक किंवा लांब उडीसारख्या शारीरिक चाचण्या देताना अडचणी येऊ शकतात. प्रत्येक मुलीला होणारा त्रास वेगवेगळा असतो. पण ऐन परीक्षेच्या दिवशी हा त्रास झाला तर कामगिरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन राज्य सरकारने मासिक पाळीच्या काळात शारीरिक चाचणी आल्यास मुलींना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतींनीही स्वागत केले आहे. अनेक महिने तयारी करून शारीरिक चाचणीची वेळ येते. मात्र, मासिक पाळीमुळे वेदना आणि अशक्तपणाचा सामना करावा लागला तर अपेक्षित कामगिरी करणं कठीण होते. त्यामुळे केवळ मासिक पाळीमुळे एखाद्या मुलीची संधी हुकू नये, अशी भावना या तरुणींनी व्यक्त केली आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेमुळे पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, यासाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, आरोग्य तपासणीचे निकष काय असणार आणि अधिकृत नियमावली कधी येणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
‘पोलीस भरती घोटाळा’ रॅकेट उघडकीस आणणार्या वैभव चव्हाण याचा संशयास्पद मृत्यू…
पोलिस भरतीवेळी प्रेम, नोकरी अन् युवतीने घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन्…
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू…
पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी व्हायरल; अधिकाऱ्याने दिले शूज…

