पती रात्रपाळीवरून अचानक घरी अन् पत्नी नको त्या अवस्थेत…

लखनौ (उत्तर प्रदेश): पती रात्रपाळी असल्याचे सांगून कामाला गेल्यानंतर अचानक रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर त्याला पत्नी घरात नसल्याचे दिसली. पत्नीचा शोध घेतला असता शेजारी राहणाऱ्या युवकासोबत नको त्या अवस्थेत आढळून आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एक युवक (वय २०) पत्नी आणि दीड वर्षांच्या दोन जुळ्या मुलींसह तो बिलगा परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. ट्रॅक्टरचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीत तो काम करत होता. मंगळवारी रात्री त्याने रात्र पाळी असल्याचे सांगून घर सोडले. मात्र, रात्री सुमारे एक वाजता तो अचानक घरी परतला. पत्नी घरात नसल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या घनश्यामच्या खोलीत शोध घेतला. तिथे पत्नी आणि घनश्याम नको त्या अवस्थेत आढळले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पत्नीला शेजाऱ्याच्या खोलीत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. मंगळवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर बुधवारी सकाळी पुन्हा वाद वाढला. संतापलेल्या पतीने आधी विषारी पदार्थ प्राशन केला आणि त्यानंतर पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. या झटापटीत पतीच्याही गळ्याला चाकू लागून दुखापत झाली. दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेच्या गळ्यावर सुमारे 20 सेंटीमीटर लांब आणि 3 सेंटीमीटर खोल जखम होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. पतीच्या गळ्यावरही चार ते पाच सेंटीमीटरची जखम होती. दोघांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पती भजनाच्या कार्यक्रमात व्यस्त अन् पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्…

महिलेचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध अन् दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं…

नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने बाल्कनीतून मारली उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!