नाशिक हादरलं! युवती आजारी असतानाही दोघांकडून लैंगिक अत्याचार…

नाशिक: नाशिकच्या पंचवटीतील पवार चाळ परिसरात युवतीवर (वय १९) अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवती आजारी असतानाही दोन आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

विक्रमकुमार शाह आणि अशोक शाह (दोघेही रा. गोपालगंज, बिहार) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा पीडितेचा आरोप आहे. 10 ऑक्टोबरला रात्री तिची प्रकृती बिघडल्याने विक्रम शाह याने तिला पंचवटीतील एका क्लिनिकमध्ये नेले. त्यानंतर ग्लुकोज पावडर देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी नेलं अन् तिथं तिच्यावर अत्याचार केला. आरोपी विक्रम शाह आणि साथीदार अशोक शाह या दोघांनी लैंगिक अत्याचार केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही सांगितलं तर वडिलांना जीवे मारून टाकील, अशी धमकी आरोपींनी तरुणीला दिली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला पीडित युवतीने पोलिसांना घटना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने आरोपींना अटक केली. याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…

नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…

नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

नाशिक! डॉ. मनीषा जेजूरकर प्रकरणात नवा ट्विस्ट; दाजीचं वागणं खूप बदललं…

नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!