डॉक्टर भूलीचे औषध, सलाईन घेऊन गेला बाथरुममध्ये अन् वाजली मोबाईलची रिंग…

मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरने शनिवारी संध्याकाळी वसतीगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवचरण आप्पा पाटील असे आत्महत्या केलेल्या निवासी डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे सायन रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिवचरण पाटील याने ॲनस्थेशियाचा (Anesthesia drugs) ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी संध्याकाळी सायन रुग्णालयाच्या वसतीगृहातील त्यांच्या रुममध्ये त्याचा मृतदेह सापडला. शिवचरण पाटील हा सर्जरी विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवचरण पाटील शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात नसल्याचे निदर्शनास आले. ते रुग्णालयाच्या पीजी वसतीगृहात राहतात. ते वॉर्डमध्ये कामाला आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या रुम पार्टनरला शिवचरण पाटील खोलीत आहेत का, हे पाहून या, असे सांगण्यात आले. त्यानुसार शिवचरण पाटील यांचा सहकारी खोलीत गेला. तेव्हा शिवचरण खोलीत दिसला नाही. त्याला फोन केला तेव्हा त्याच्या मोबाईलचा आवाज बाथरुममधून आला. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्याला संशय आला. त्यांनी याबाबत इतरांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी रुममध्ये येऊन बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा शिवचरण पाटील मृतावस्थेत आढळून आले.

पोलिसांनी शिवचरण पाटील यांच्या रुममधील बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या हाताला IV सलाईन लावली होती. कमोडमध्ये ॲनस्थेशियाच्या औषधाच्या दोन बाटल्या आढळून आल्या. यावरुन शिवचरण पाटील याने स्वत:चे हे औषध शरीरात इंजेक्ट केले असावे. त्यांचा एडीआर रिपोर्ट आल्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल. अहवाल हाती आल्यानंतर कारण पुढे येईल, असे पोलिसांनी सांगितले.

महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल…

डॉक्टरांची भावनिक पोस्ट प्रचंड व्हायरल अन् चिमुकलीचे आई-वडील आले समोर; धक्कादायक कारण…

डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये ‘जनआक्रोश आंदोलन’ ‘एसआयटी’ चौकशीची मागणी…

प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…

नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!