
महाराष्ट्राला हादरला! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर लॉजवर सामूहिक अत्याचार…
सांगली: सांगली जिल्ह्याच्या ईश्वरपूर शहरात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर (वय २०) सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शार्दुल विद्यापती पाटील (वय २१, रा. रेठरेधरण) आणि प्रथम सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) असं संशयित आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शार्दुल पाटीलला तत्काळ अटक केली आहे. दुसरा आरोपी प्रथम पाटील हा सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींनी पीडितेला एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी तिला गुंगीचं औषध दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीवर अशाप्रकारे सामूहिक अत्याचार झाल्याने कॉलेज प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही मूळची सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून ती ईश्वरपूर येथे अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे. संशयित आरोपींनी पीडितेसोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. आरोपींनी तिला गोड बोलून ईश्वरपूर येथील कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तिथे तिच्या नकळत शीतपेयातून गुंगीचे औषध देण्यात आले. युवतीला गुंगी येताच दोन्ही मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
घडलेला संपूर्ण प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकी देखील आरोपींनी युवतीला दिली. मात्र, पीडित युवतीने तातडीने ईश्वरपूर पोलिस ठाणं गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
राजधानी हादरली! मित्राला पकडले अन् मुलीवर सामूहिक बलात्कार…
अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…
जळगाव! ट्रॅक्टर मालकासह चौघांनी शेतात केला सामूहिक अत्याचार…
पुणे! आळंदी परिसरात घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार…
सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

