
समृद्धी महामार्गावरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू…
अमरावती : धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर दुर्गामातेची मूर्ती घेऊन परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनाचा मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. शेगाव येथून दुर्गामूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या बोलेरो पिकअपला मागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
वर्ध्यातील सोमनाथ लेआउट, सिंदी मेघे परिसरातील नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गामातेची मूर्ती आणण्यासाठी शेगाव येथे गेले होते. त्यांनी दुर्गामातेची उंच मूर्ती घेतली आणि बोलेरो पिकअप वाहनातून वर्ध्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. समृद्धी महामार्गाने वर्ध्याच्या दिशेने येत असताना धामणगाव परिसरातील चॅनल 97 जवळ त्यांच्या वाहनाला मागून ट्रकने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि वाहनातील कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. या धडकेत पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला. काही कार्यकर्ते वाहनातून बाहेर फेकले गेले.
View this post on Instagram
धामणगाव परिसरातील चॅनल 97 जवळ त्यांच्या वाहनाला मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला. काही कार्यकर्ते वाहनातून बाहेर फेकले गेल्याची माहिती असून अनेक जण गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सुरुवातीला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असलेल्या जखमींना पुढील उपचारांसाठी वर्ध्यातील वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नवरात्रौत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला मंडळातील कार्यकर्त्यांच्या मृत्यूमुळे वर्धा आणि परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये…
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…
समृद्धी महामार्गावर बाजूला काम करत असलेल्या 6 महिलांना ट्रकने चिरडलं…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…

