
प्रेमविवाह अन् एका फोनच्या संशयावरून सायलीने गमावला जीव…
मुंबई: नवऱ्याच्या मारहाणीनंतर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरात उघडकीस आली आहे. लग्नाच्या चार दिवसानंतरच नवऱ्याने खरे रंग दाखवले अन् सायलीला आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
नवी मुंबईच्या घणसोली परिसरात नवीन विवाह झालेलं जोडपं राहत होतं. सागर कदम आणि सायली लोखंडे असे दोघांचे नाव. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. परंतु, सागर पत्नीवर संशय घेत होता. मोबाईलवर आलेल्या एका फोनच्या संशयावरून सागरने सायलीला अमानुष मारहाण केली. पोटावर लाथाबुक्क्यांनी मारल्याने सायलीला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा पतीवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये आणि नव्याने सुरू झालेला संसार टिकावा म्हणून ‘मी जिन्यावरून पडून जखमी झाले’ असा खोटा जबाब तिने पोलिसांना दिला. परंतू तिची प्रकृती खालावत चालल्यानं तिने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर दोन महिन्यानंतर आता तिचा मृत्यू झाला आहे.
View this post on Instagram
आरोपी सागर कदम हा इंजिनिअर आहे. दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. रबाळे एमआयडीसीतील एका खासगी कार्यालयात कामाला असलेली सायली अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ कंप्लेंट दिल्यावर पोलिसांनी शोध घेतला असता, तिने आणि सागरने पळून जाऊन लग्न केल्याचे समोर आले होते. त्यानंतर दोघंही घणसोलीमध्ये राहत होते.
कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…
पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…
सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…
प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

