भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं…

चंद्रपूर : ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाने एका भोंदू बाबाने विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. याप्रकरणी भीसी पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम खंगार याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

पीडित महिलेच्या (वय २७) पतीची प्रकृती वारंवार बिघडत असल्यामुळे त्यांनी शुभम महाराजासोबत पूजेसाठी संपर्क केला. त्याप्रमाणे रविवारी मध्यरात्री ही पूजा पीडितेच्या घरी करण्यात आली होती. आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला पूजेचे साहित्य आणण्यासाठी बाहेर पाठवून त्या विवाहितेवर बलात्कार केला. त्यानंतर पीडीतेने ही बाब आपल्या पती व घरच्यांना सांगितल्यानंतर आरोपींविरोधात भीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्याप्रमाणे शुभम लटारी खंगार (वय २६, रा. मसाडा, ता. वरोरा) याच्यासह त्याला मदत करणारे त्याचे दोन साथीदार सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांना अटक करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, महिलेसोबत घडलेल्या प्रकरामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगाळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर मुळे करत आहेत.

पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…

पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…

पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…

भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…

भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!