नाशिक! प्रेमात मला फसवले, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्…

नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये वरुण भामरे (वय २६) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. गंगापूर पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

‘प्रेमात फसविले, माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले’ असा चिठ्ठीत उल्लेख केला आहे. ‘काल रस्त्यात अडवून मारहाण केली, तू मर नाही तर…’ अशी धमकी दिल्याचा आरोप त्याने केला आहे. संबंधितांकडून घेतलेले पैसे परत मागितल्याने धमकावल्याचा वरुणचा दावा आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे चिठ्ठीतून न्यायाची मागणी देखील केली आहे, त्याचबरोबर ‘यांना शिक्षा करा’ अशी विनंती देखील त्याने शेवटच्या चिठ्ठीत केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

‘तिने मला प्रेमात फसवले, हवे तेवढे कॅश काढून घेतले अन् मला धमकावून तू मर नाही तर…’ असे सांगून रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप ‘सुसाइड नोट’मध्ये करत एका वरुण भाऊसाहेब भामरे (२६, रा. गोकुळधाम, ध्रुवनगर, गंगापूर) याने गुरुवारी (ता. २०) सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. त्याने संबंधितांची नावे चिठ्ठीत लिहून न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगून ‘प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल, पण यांना शिक्षा करा’ अशी थेट पोलिस आयुक्तांकडे मागणी केली आहे.

वरुणचे एका युवतीवर प्रेम होते. त्याने आयटीआयपर्यतचे शिक्षण घेतले होते. तो आपल्या कुटुंबासमवेत गोकुळधाम सोसायटीत राहत होता. त्याने राहत्या घरात त्याच्या रूममध्ये सायंकाळी चिठ्ठी लिहून गळफास घेतला आहे. वरूणला बेशुद्धावस्थेत त्याचा मावसभाऊ तेजस पवार याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून वरुणला मृत घोषित केले. त्याच्या मागे आई, वडील, आजी, दोन बहिणी, काका असा परिवार आहे.

चिठ्ठीत म्हटले आहे की, कमिश्नर संदीप कर्णिक सर माझ्या मरण्यामागे हे हे तिघे आणि तिचे भाऊ आहे. काल त्यांनी मला रस्त्यात अडवून मारलं आणि धमकी दिली, की तू मर नाही तर…’ त्यांना माझे घेतलेले कॅश द्यायचे नाही वन टाइम, त्यामुळे माझ्यावर काहीही आरोप लावला आहे. तिने मला प्रेमात फसवले व माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले. मी माझे कॅश वन टाइम मागितले तर तुझी वाट लावू अशी धमकी देतात. संदीप कर्णिक सर माझी तुम्हाला विनंती आहे, मोठे माणसे पैशांच्या जीवावर काहीही करु शकता, पण मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल पण यांना शिक्षा करा, असंही वरूणने म्हटले आहे.

नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…

नाशिक दुहेरी हत्याकांडाने हादरले! पतीने पत्नी, मुलाचा चिरला गळा अन्…

नाशिकमध्ये युवतीची भररस्त्यात सपासप वार करत हत्या…

नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…

सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!