
पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…
पुणे : व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात हातोडा मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरूड) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो १२ वीच्या वर्गात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नील आणि आरोपी दोन्ही अल्पवयीन मुलं एकाच परिसरातील रहिवासी असून एकमेकांच्या ओळखीचे होते. मंगळवारी हे तिघे एकाच दुचाकीवरून राजगड येथील शिवमंदिरात दर्शनासाठी गेले होते. बुधवारी पहाटे तेथून परतल्यानंतर ते कोथरूड येथील एआरएआय (ARAI) टेकडीवर गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला आणि दोन्ही अल्पवयीन मुलांनी नीलच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांपैकी एकाला काही युवकांनी पूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे सध्या सध्या जेलमध्ये आहेत. मृत नील हा जेलमध्ये असलेल्या त्या तरुणांचे फोटो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवत असल्याचा राग मनात धरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आली.
दरम्यान, बुधवारी सकाळी टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकांना एका मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ कोथरूड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता नीलच्या खिशातील मोबाईलवरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी दोन्ही संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पुणे! जुन्नरचा आरोपी ऐटीत म्हणाला, बघा बघा मी सायकलवरून चाललोय…
पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…
पुणे! ‘अरे तू, पोरींना काय बोलला. आमच्याबरोबर चल…’, रिल स्टार अटकेत…
पुणे! मोशी येथील सोनाली मृत्यू प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…

