
पुणे! एक कोटी दरोडा प्रकरणानंतर पैसेही गेले अन् पोलिसाची वर्दीही गेली…
पुणे : पुणे शहरातील नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नात थेट सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री यांना निलंबित करण्यात आले आहे.
नवले पुलाजवळ दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तक्रारदार हर्षवर्धन पवार यांना खेडशिवापूर पोलिस चौकीत घेण्यात आले होते. तिथे पोलिस हवालदार प्रमिला निकम हिने कथित पत्रकार आशिष तिवारी यांच्या साथीने बॅगेतील वीस लाख रुपयांची रोकड बाहेर काढल्याचा गंभीर आरोप तपासात निष्पन्न झाला. सोबतच साडेदहा लाख रुपये अधिकृत मुद्देमाल म्हणून दाखवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न झाल्याचा तपासातून समोर आले आहे. कथित पत्रकार आशिष तिवारी याने आपल्या गाडीत ठेवलेली रक्कम सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रमिला निकम यांनी मदत केल्याचे ही स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिस नाईक अजित मेस्त्री याची देखील साथ असल्याचे तपासातून दिसून आले आहे. त्यानंतर आता दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, एक कोटी रुपयांच्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला पण तोतया पत्रकारासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचं बिंग फुटले. यात एका महिला पोलिस हवालदार आणि एका पोलिस नाईकाचाही या कटात सहभाग असल्याचे समोर आले. खरंतर सुरुवातीला पोलिसांची आणि कथित पत्रकाराचे नावं गुन्ह्यातून वगळण्यात आले होते. मात्र पुन्हा पुरवणी गुन्हा जोडण्यात आला अन पुणे ग्रामीण पोलिस दलातील आणखी एक कारनामा उघड झाला.
तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्यासोबत हा दरोड्याचा थरार घडला. हर्षवर्धन सोबत त्यांचे शेजारी किरण आपटे होते. किरण यांच्या ओळखीतील चव्हाण इंटरप्रायजेस यांना एक कोटी रुपयांची गरज होती. त्यामुळे किरण यांनी हर्षवर्धन यांना याबाबत कळवले, तेव्हा ते एक कोटी रुपये देण्यास तयार झाले. 18 जुलैला तेचं एक कोटी रुपये देण्यासाठी हर्षवर्धन आपल्या कामगारासोबत दुचाकीवरून पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आले. किरण आपटे ही तिथं पोहचले, हॉटेल ब्रम्हाजवळ ते थांबले. किरण आपटे ही तिथे पोहचले होते. दुपारी साडे बाराच्या सुमारास चव्हाण इंटरप्रायजेसची एक व्यक्ती चार चाकीतून हॉटेल जवळ आले. आपटे यांनी हर्षवर्धनला फोन केला. गाडी आलेली आहे, नऱ्हे येथील एचडीएफसी बँकेत आपल्याला ही एक कोटींची रक्कम भरायची आहे. तुम्ही या, आपण निघुयात. मग हर्षवर्धनने कामगाराला तळेगावला जायला सांगितले. पुढं हर्षवर्धन, आपटे, विक्रम चाकणकर नावाचा चालक आणि त्याच्या बाजूला एक असे चौघे गाडीत बसले. दोघांच्या मध्ये एक कोटी रुपयांनी भरलेल्या दोन बॅग होत्या.
नऱ्हे पुलाच्या खालून बँकेकडे जायचं होतं, मात्र प्रत्यक्षात चालकाने गाडी थेट पुलावर घेतली. तितक्यात मागून एक दुचाकी आली आणि आमच्या गाडीला आडवी मारली. दुचाकीवरून दोघे खाली उतरले, त्यांनी मागची काच खाली घ्यायला लावली आणि आम्ही पोलिस आहोत, तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चाललेला आहात, याची आमच्याकडे माहिती आहे. तुम्ही हे पैसे घेऊन कुठं चाललाय, गाडी बाजूला घ्या. चालकाने गाडी बाजूला घेतली. मग दुचाकीवरील दोघे आणि आमच्या गाडीतील चालकाच्या बाजूची व्यक्ती असे तिघे मिळून हर्षवर्धन आणि आपटे कडील पैशांची बॅग बळजबरीने ओढू लागले. तितक्यात एकाने हर्षवर्धनच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकली. झटापट सुरुचं होती, अशात 73 लाख 50 हजार रुपयांनी भरलेली बॅग घेऊन आपटे कसेबसे गाडीतून खाली उतरले. पण हर्षवर्धन गाडीतून बाहेर पडू शकला नाही. मग दुचाकीवरील एका अनोळखी इसमाने चालकाला गाडी खेड शिवापूर पोलिस चौकीकडे घेण्यासाठी दमदाटी केली. मात्र हर्षवर्धनने गाडी बाजूला घ्यायला लावली. त्यावर त्या चालकाला धमकावले आणि गाडी चालवायला भाग पाडले. अखेर दुपारी दोनच्या सुमारास गाडी खेड शिवापूर पोलिस चौकीत पोहचली. तिथं हा अनोळखी व्यक्ती खाली उतरला, चालकाकडून गाडीची चावी हिसकावून घेतली. मी पोलिस आहे आणि यांच्याकडे दोन नंबरचे पैसे आहेत. मी यांना पकडून इथं आणलं आहे. असं ओरडून सर्वांना सांगू लागला. त्यावेळी खेड शिवापूर पोलिस चौकीत त्या दिवशी सुट्टीवर असणाऱ्या पोलिस हवालदार प्रमिला निकम खाकी परिधान करुन उपस्थित होत्या आणि त्यांच्या मदतीला पोलिस नाईक अजित मेस्त्री ही होते. या दोघांनी त्या अनोळखी व्यक्तीची म्हणजे तोतया पत्रकार आशिष तिवारीची बाजू घेतली आणि हर्षवर्धनला धमकवायला सुरुवात झाली. तुम्ही दोन नंबरचा धंदा करताय, हा मोठा गुन्हा आहे. असे म्हणून हर्षवर्धनला अटकेची भीती घालण्यात आली. पण घडला प्रकार वरिष्ठ पोलिसांच्या कानावर पडला होता, ते तातडीनं खेड शिवापूर पोलिस चौकीत पोहचले अन या दोन पोलिसांसह कथित पत्रकाराचे बिंग फुटले. हर्षवर्धनच्या बॅगेतून काही रक्कम गायब झाली होती, जी वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने परत देण्यात आली. त्यानंतर हर्षवर्धनने नऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पण सुरुवातीला दोन पोलिसांची आणि तोतया पत्रकाराची नावं गुन्ह्यातून टाळली होती. नंतर पुरवणी गुन्ह्यात ती नावं पोलिसांनी समाविष्ट करावी लागली.
या प्रकरणात स्वतःला पत्रकार सांगणारा आशीष तिवारी याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हा कट उघडकीस आणला. तपासादरम्यान राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित इरफू मेस्री यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी एकूण दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिस दलात खळबळ! वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल…
पोलिसकाका वाटतात तितके वाईट नव्हते निलंबित करू नका; युवकाने सांगितली इनसाईड स्टोरी…
पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…
विषारी दारू! पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार जणांचे तत्काळ निलंबन…
पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…

