नांदेड! पती-पत्नीचे मध्यरात्री जोरदार भांडण अन् तीन राऊंड गोळीबार…

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी (ता. ६) मध्यरात्री कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नीवर गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना यांच्यात सोमवारी मध्यरात्री भांडण झाले. या वादातून विशालने रागाच्या भरात पत्नी अर्चना यांच्यावर विनापरवाना गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत घुसल्याने रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. यानंतर त्यांना नांदेडला हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने पीडित महिला सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, फरार आरोपी विशाल याच्यावर यापूर्वी 2023 मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. शिवाय, मे 2025 मध्ये पेट्रोल पंप लुटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत. लोहा शहरात थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शहरातील वाढता अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारीवर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास घडली गोळीबाराची घटना अन् १२ तासाच्या आत…

जळगाव! नवरा म्हणाला, दिपालीचा खून केला, मला अटक करा…

नर्सला Kiss करताना दिसला नवरा अन् डॉक्टर महिलेने उचलले मोठे पाऊल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!