
राजगड पाहायला निघालेल्या पर्यटकांची बस खोल दरीत कोसळली बस…
पुणे : ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची खाजगी ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारे २० जण पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सने राजगड किल्ल्याकडे निघाले होते. आज (रविवार) सकाळच्या सुमारास बस वेल्हा आणि खानापूर दरम्यान असलेल्या दुर्गम पाबे घाटात आली होती. एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स थेट रस्त्यावरून खाली शेकडो फूट खोल दरीत कोसळली.
View this post on Instagram
ट्रॅव्हल्स दरीत कोसळताच घाटात प्रवाशांच्या किंकाळ्यांनी एकच खळबळ उडाली. यावेळी झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर अनेक प्रवासी गाडीतच अडकून पडले आणि गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने तातडीने दरीत उतरून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. रेस्क्यू टीमने स्थानिक लोकांच्या मदतीने ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या इतर १८ प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.
दरम्यान, सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत घाटातून प्रवास करताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आता प्रशासनाकडून केले जात आहे.
सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचे अपघाती निधन; चाहत्यांना धक्का…
हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…
सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…
भीषण अपघात! सातारच्या आठ मित्रांची हर्णे बीचची ट्रीप ठरली अखेरची; पाहा मृतांची नावे…
पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू तर…

