महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर…

मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमार्फत 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहिम, सायबर सुरक्षा, आधुनिक शस्त्रे, वाहने सुसज्ज करण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल. महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अतिशय मनापासून आभारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सध्याच्या काळात नेहमीच्या गुन्हेगारीसोबतच डिजिटल आणि संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी पोलिसांकडे केवळ मनुष्यबळ असून चालणार नाही, तर तांत्रिक बळ असणेही तितकेच गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वात सुसज्ज, कार्यक्षम आणि हायटेक दलांपैकी एक बनेल, असा विश्वास प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर व सायबर सेलचे सक्षमीकरणासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. राज्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा आणि संसाधनांची उभारणीसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस दलाला अत्याधुनिक शस्त्रे आणि घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी नवीन वेगवान वाहने पुरवणेयासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना करण्यासंदर्भात या निधीचा वापर केला जाणार आहे.

राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी…

राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा नावे…

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे बदल, 30 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा नावे…

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!