नांदेड! आंचल मामीडवार प्रेम प्रकरणात आला मोठा ट्विस्ट…

नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, आंचल मामीडवार प्रेम प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

आयुष्यभर प्रियकर सक्षमच्याच घरी राहणार असे म्हणणाऱ्या आंचल मामीडवार हिने त्याचं घर सोडलं आहे. ती आता आपल्या आजीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली होती. सक्षमच्या आईने एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती सांगितली त्यानंतर ट्रोल होत असलेल्या आंचलने समोर येऊन घर सोडण्याचे कारण सांगत सक्षमचा भाऊ तिच्यासोबच चुकीचं वागत असल्याचे तिने सांगितले. त्यावरून आता सक्षमच्या आईने आणि आत्याने आंचलचे सक्षमच्या भावासोबत झालेले बोलणे आणि ती त्यात काय म्हणते याची माहिती सांगत माझ्या मुलाला बदनाम करू नको असं म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, आंचल मामीडवारने सक्षम ताटेचं घर सोडल्याचे कारण सांगितले आहे. सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप केला आहे. तो आपल्यासोबत चुकीचं वागत होता, त्याने अनेकदा मला चुकीचा स्पर्श केला असा आरोप आंचलने केला आहे. त्याचबरोबर तो जो माझाशी वागत होता, याची मी याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना देखील दिली, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून आपलं त्याचं घर सोडलं असं आंचलने म्हटलं होतं, परंतु या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे.

आंचलने सक्षमच्या लहान भावावर आरोप केल्यानंतर आता सक्षमच्या आत्या आणि आईने मोबाईलमधील काही मेसेज दाखवून मोठा दावा केला आहे, त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना चॅट दाखवत म्हटलं की, आता आमचं एकच लेकरू आहे, मी तिला हात जोडून विनंती करते की आता आमच्या मुलाला बदनाम करू नको. त्याने तुला काहीही केलं नाहीये. तो सारखा तुला वहिनी वहिनी करायचा, असं सक्षमच्या आत्याने म्हटलं आहे. दरम्यान यावेळी सक्षमच्या आत्याने आंचलचे काही मेसेज देखील प्रसारमाध्यमांना दाखवले आहेत, ज्यामध्ये आंचल सक्षम ताटेच्या भावाला ‘बोल की बाळा’ असं म्हणत आहे. तसेच तिचे इतरही काही मेसेज समोर आले आहेत, यावरून सक्षण ताटेचा भाऊ आणि आंचलमध्ये संवाद सुरू होता, असे दिसून येत आहे.

प्रियकर सक्षमचं घर का सोडलं? आंचलने सांगितलं धक्कादायक कारण…

आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करत घेतली थपथ अन् काही महिन्यातच…

नांदेड! युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा…

नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर…

प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…

पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!