‘छावा’मध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप; धक्कादायक योगायोग…

मुंबई: ‘छावा’ चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या आणि अनेक हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगले (वय ३०, रा. नालासोपारा) हिने घरात गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

संचिताच्या आत्महत्येमध्ये एक अत्यंत धक्कादायक योगायोग समोर आला आहे. १४ जून रोजी बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जगाचा निरोप घेतला होता, नेमक्या त्याच दिवशी म्हणजे १४ जून रोजी संचितानेही हे टोकाचे पाऊल उचलले आहे. संचिताने आत्महत्या करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी तिने सोशल मीडियावर सुशांतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर तिने “It’s again 14 June… We missed uhh Sushant Sir” अशी नोट लिहिली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच तिने राहत्या घरी बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

संचिताचे वडील एक खाजगी वाहनचालक आहेत, अशा परिस्थितीत अत्यंत सामान्य घरातून येऊन संचिताने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या हिंदी मालिकेत मुख्य नायिका ‘सुकून’ची भूमिका मिळवली होती. याशिवाय ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही तिने काम केले होते. संचिताच्या या आत्महत्येमागचे कारण अजून स्पष्ट झाले नसले, तरी तिच्या चुलत भावाने मनोरंजन विश्वातील भीषण वास्तव मांडले आहे, ‘संचिता गेल्या काही दिवसांपासून कामाच्या अस्थिरतेमुळे आणि चित्रपट-मालिकांमधील तीव्र संघर्षामुळे प्रचंड मानसिक नैराश्यात होती. तिला तिच्या क्षमतेनुसार अपेक्षित काम मिळत नव्हते.”

संचिताने घरात कोणी नसताना हे पाऊल उचलले आहे. बहिणीने घरात आल्यावर हा प्रकार पाहिला आणि तिला तातडीने तुळींज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. आचोळे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आंचल खुराना हिनं टेलिव्हिजनच्या दुनियेचं सत्य सांगितलं. इंडस्ट्रीचं जग चमचमतं, ग्लॅमरस भासतं, पण त्यामागे एक वेगळंच जग असतं, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. अनेक सेलिब्रिटींनी याबाबत वाच्यताही केली आहे. अभिनेत्री आंचल खुराना म्हणाली की, “हे फारच दुःखद आहे, कारण 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याचंही निधन झालेलं. मी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे आणि मला चांगलंच माहितीय की, हे जग कसंय… आजकाल कास्टिंगमध्ये खूप पक्षपातीपणा केला जातोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर अतिप्रमाणात भर दिला जातोय. त्यांच्यातूनच लीड अॅक्टर्स निवडले जातात आणि त्यांना 50 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत मानधन दिलं जातं, ज्यामुळे इतर कलाकारांना खूप वाईट वाटतं. तुम्हाला सांगते, जर त्यांनी 5 हजार रुपये मानधन निश्चित केलं असेल आणि तुम्ही 6 हजार रुपये मागितले, तर ते त्याऐवजी सरळ एखाद्या नव्या कलाकाराला घेतात, मग त्या व्यक्तीला अभिनयाचं कौशल्य अवगत आहे की नाही, याचा ते विचारही करत नाहीत. यामुळे कलाकारांवर खूप ताण येतो…”

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💗 (@ishwari16official)


प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!