
स्वारगेट पोलिसांनी प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास केले जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पीएमटी बसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील एकुण ४,४०,०००/- रुपये किंमतीचे २७ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ११८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) मधील फिर्यादी हे पीएमटी बसमध्ये बसण्यासाठी चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने त्यांचे हातातील सोन्याची बांगडी चोरी केली होती. त्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वारगेट पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी तपास पथकातील अंमलदार यांना पीएमटी स्टॅन्डचे सीसीटिव्ही फुटेज पाहुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले. त्यावरुन आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार सागर काळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हा स्वारगेट कॅनॉलजवळ थांबला आहे. स्टाफचे मदतीने पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरुन तपास पथकातील अंमलदार सपोनि अभिजीत पाटील, सागर काळे, नाना भांदुर्गे व सुजय पवार यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन सापळा लावला.
View this post on Instagram
संशयित व्यक्तीस ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सुधीर नागनाथ जाधव (वय ४८ वर्षे धंदा – काहीनाही रा. घर नं-७६८ साऊथ इंडियन शाळेच्या पाठीमागे शास्त्रीनगर अंबरनाथ वेस्ट ठाणे) असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तद्नंतर त्याचेवर संशय अधिक बळावल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिश्यामध्ये दाखल गुन्ह्यातील चोरी केलेली बांगडी मिळुन आली. त्यावरुन त्यास ताब्यात घेवुन तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यातील एकुण ४,४०,०००/- रुपये किंमतीचे २७ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, संजय दराडे, सह-आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मिलींद मोहिते, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- २, पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर, विकास भारमळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो.हवा. अश्रुबा मोराळे, नाना भांदुर्गे, सागर केकाण, हर्षल शिंदे, प्रशांत टोणपे, पोलिस अंमलदार सागर काळे, सुजय पवार, रमेश चव्हाण, संग्राम केंद्रे, दिपक खेंदाड, संदीप घुले व हनुमंत दुधे यांनी एकत्र मिळुन केली आहे.
पुणे! देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे! स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे! स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस…
पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…
पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये तिघांना लाखो रुपयांचा गंडा…

