
पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…
पुणे : पुणे शहरातील मुंढवा परिसरातील ब्युटीपार्लर चालक युवतीच्या खूनप्रकरणाचा छडा अखेर पुणे गुन्हे शाखेने लावला असून, अनैतिक संबंध तसेच आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोरखनाथ देवराव शिंदे (वय 44, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. बीड) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
आफरीन सलीम पठाण (वय 29, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ रा. पालघर) असे मृत युवतीचे नाव आहे. याबाबत आफरीनच्या लहान बहिणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 5) आफरीन एका महिला ग्राहकाच्या घरी गेली होती. त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास केशवनगर परिसरातील कचरा डेपो जवळ रस्त्याच्या कडेला एका युवतीचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपास करत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी गोरखनाथ शिंदे आफरीनसोबत दुचाकीवर जाताना दिसून आला. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आफरीन आणि आरोपी यांची मैत्रीतून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. आर्थिक देवाणघेवाण आणि वैयक्तिक वादातून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. याच कारणातून आरोपीने आफरीनची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहेत.
पुणे! अलंकार पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांविरोधात नागरिकांचा रोष…
पुणे पोलिस दलातील पोलिसाचा प्रताप; कोम्बिंग ऑपरेशन कारण अन् पत्नीने पकडले रंगेहाथ…
संतापजनक! पुणे जिल्ह्यात मार्कशीटवर खाडाखोड केल्याने मुलीला क्रूरपणे संपवलं…
पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…
पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…

