
पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये, एक कारचालक युवकाला बोनेटवरून फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे.
काळूस गावात चारचाकी गाड्यांमधून आलेल्या टोळक्याने गावात दहशतीचा थरार माजवत संबंधित व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आणि एकाला गाडीच्या बोनटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अक्षय डुंबरे यांनी त्यांच्या हायवा गाडीच्या कामाचे पैसे आरोपींकडे मागितल्याने हा वाद झाल्याची माहिती आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
आरोपींनी काळूस ग्रामपंचायत परिसरात येत अक्षय डुंबरे यांना गाडीतून ओढून बाहेर काढत मारहाण केली. त्यानंतर, त्यांच्या आई-वडिलांसह मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शेखर पोटवडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, आरोपी पळून जात असताना गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना गाडीच्या बोनटवर उचलून सुमारे 100 फूट फरफटत नेण्यात आले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…
पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…
मनोहर मामाचा आणखी एक कारनामा समोर, पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून उचललं…
पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला अत्याचार; गरोदर राहताच…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

