नाशिक! TCS प्रकरणात धक्कादायक खुलासा, पासवर्ड अश्लील शब्दांचा अन्…

नाशिक: IT क्षेत्रातील TCS कंपनी मधील महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातून एका ‘गुप्त’ व्हॉट्सॲप ग्रुपचे बिंग फुटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपींनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. ग्रुप लीडर दररोज महिला कर्मचाऱ्यांना आणि युवतींना उद्देशून आक्षेपार्ह मेसेज पाठवत असे. या ग्रुपच्या माध्यमातून महिलांचे खच्चीकरण करणे आणि त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचे काम केले जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑफिसमधील इंटरनेट Wi-Fi चा पासवर्डही भयंकर होता. आरोपी जाणीवपूर्वक दररोज इंटरनेटचा पासवर्ड बदलत असत. हा पासवर्ड अश्लील शब्दांचा किंवा युवतींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा नावांचा ठेवला जात असे. केवळ पासवर्डच्या बहाण्याने महिलांना हिन वागणूक देणे आणि त्यांच्या श्रद्धांचा अपमान करण्याचा हा विकृत प्रकार ऑफिसमध्ये सर्रास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोबाईलमधील डेटा आणि व्हॉट्सॲप चॅट्समधून समोर आलेली माहिती पाहता, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या आरोपींचा पुन्हा ताबा घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे दाद मागण्याची शक्यता आहे.

नाशिक! TCS कंपनीतील निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणीपूर्वीच धक्कादायक माहिती समोर…

नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…

नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…

नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…

नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…

अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…

नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!