पुणे! स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना १८ तासाच्या आत केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्यानी मारहाण करत लूटमार करणाऱ्या दोघांना 18 तासाच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

दिनांक 05/04/2026 रोजी सायंकाळी 20:50 वा.चे सुमारास मौजे निगडे (ता. वेल्हा, जि. पुणे) गावचे हद्दीत सेंट्रींग चे काम पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस त्या ठिकाणी डोळ्यात मिरची पावडर टाकून जबरीने फिर्यादीस मारहाण करुन त्यांचे जवळील कि. ५,६७,५००/- रु. चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले म्हणून वेल्हा पोलिस स्टेशन गु.रजि.नं. 26/2026 भारतीय न्याय संहिया कलम 309(6),351, 352,115(2),3(5) गुन्हा दाखल झाला होता.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

स्थानिक गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे आदेशाने गुण्याचे समांतर तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे मुळशी परिसरात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने शिंदेवाडी (ता. मुळशी जि. पुणे) येथे सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला आहे. आरोपी १) प्रसाद सतिश शिंदे (वय २२, रा. शनिनगर कात्रज पुणे), २) अभिषेक सचिन खुटवड (वय २३, रा. संतोषनगर कात्रज पुणे) यास वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी वेल्हा पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी वर आरोपी क्र १ यावर खून ,जबरी चोरी असे 2 गुन्हे दाखल व आरोपी क्र 2 वर घरफोडीचे 6 व जबरी चोरी चा 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उप अधीक्षक सुनील कुमार पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शना खाली Api दत्ताजीराव मोहिते, HC अमोल शेडगे, HC मंगेश भगत, HC तुषार भोईटे, HC संतोष भापकर, HC गणेश धनवे, Hc अतुल डेरे, Hc राजू मोमिन, वेल्हा पोलिस स्टेशनचे Api किशोर शेवते, Pc सोमेश राऊत, Pc रोहित मरभळ यांनी केली आहे.

पुणे! ‘रील स्टार’ महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलिस दलात खळबळ…

पुणे! चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; महिलेचा कपडे बदलताना Video काढला अन्…

पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!