नांदेड! गँगवारमध्ये पाच जणांचा मृत्यू; पोलिसांनी नेम धरून झाडली गोळी…

नांदेड : नांदेडमध्ये ४८ तासांत पाच खून पडले आहेत. सोनू कल्याणकर याच्या खून प्रकरणातील आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. पोलिसांनी मारलेली गोळी बरोबर आरोपीच्या पायाला लागली आणि घायाळ होऊन तो पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नांदेड शहरात शुक्रवारी रात्री गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू झाला. अनिल पंजाबी उर्फ सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये वर्चस्व वादातून तिघांचा मृत्यू झाला. सदा गँगचा अर्जित सिंघ चव्हाण आणि साई लाला गँगचे महोमद अरबाज आणि सय्यद आवेझ असे तीन गुंड ठार झाले. शिवाय, आज सकाळी पुन्हा सोनू कल्याणकर याचा खून झाला. याच खुनातील आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. नांदेडमध्ये पाच खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

नांदेड शहराच्या श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (सोमवार) पहाटे सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून तो शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी देखील आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सोनू कल्याणकरवर हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून प्रतिउत्तर दिले. त्यानंतर, जखमी आरोपीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, एकूण 4 आरोपी होते, त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या गोळी लागलेला मुख्य आरोपी अंकुश गंधमवार रुग्णालयात आहे. तर, प्रसाद उर्फ ऋषी शिंदे, कृष्णा जोगदंड आणि रवी उर्फ रोहित लोट हेही खुनाच्या घटनेतील आरोपी आहेत.

नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या…

नांदेड! युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा…

नांदेड हादरलं! मित्राच्या रूमवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह…

नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर…

नांदेड! युवकाची प्रेम प्रकरणातून मुलीच्या बापानं अन् भावानं केली हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!