पुणे! तीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या…

पुणे (सुनिल सांबारे): सुमारे ३० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा लोहमार्ग दौंड युनिट व दौड लोहमार्ग पोलिस ठाणे यांना यश आले आहे.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाणे हददीत सन १९९६ मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८ / १९९६, कलम ३९५,३९७,३३६,३४ भा. द. वी मधील आरोपी राजेंद्र शंकर भोसले उर्फ जळका राजा भोसले (राहणार राजेगाव तालुका दौड जि. पुणे) हा सुमारे ३० वर्षा पुर्वी त्याच्या साथिदारासह रेल्वेत दरोडा टाकुन फरार झाला होता. त्यातील इतर साधीदारांना त्यावेळीच पकडण्यात आले होते, परंतु सदर आरोपी हा फरार होता.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

सदर आरोपीला पकडण्या बाबत वरीष्ठांचे वारंवार आदेश होत असल्याने सदर आरोपीचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा व दौड लोहमार्ग पोलिस ठाणेची टिम ही सदर आरोपीचा तपास करत होती. एका गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहीती वरून सदर आरोपी हा दिनांक ०१/०४/२०२६ रोजी भिगवण भागात डीकसळ गावात यात्रे करीता येणार असल्याचे समजले असता तात्काळ त्या ठिकाणी सदर टीम आरोपीचा शोध घेणे करीता यात्रे मध्ये रवाना झाली व सदर आरोपीला अत्यंत चपळाईने व शिताफीने पकडण्यात त्याना यश आले.

सदर आरोपीला ताब्यात घेवून दौड लोहमार्ग पोलिस ठाणे येथे अटक करण्यात आली व सदर आरोपीला दौंड रेल्वे कोर्ट येथे हजर केले व मा. कोर्टाने सदर आरोपीस येरवडा कारागृहात रवाना करण्याचे आदेश केल्याने सदर आरोपीस येरवडा मध्यावर्ती करागृहात रवाना केले

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शना खाली, पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहा. पोलिस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, सहा पोलिस निरीक्षक हिमालय जोशी, पो.उप.निरीक्षक शरनार्थी, पो.उपनिरीक्षक भोसले, सहा.पो.उप.निरीक्षक
धनंजय वीर पो हवा आनंद वाघमारे, पो. अंमलदार नरेंद्र पवार, पो. अं. बांगर, म्हेत्रे, चव्हान, सावके, हगारे व अजमेर शेख यांनी केली आहे.

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…

पुणे विमानतळावर खळबळ! ‘चायनीज फूड’चा डबा उघडताच अधिकारीही थक्क…

पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत होणार पाच नवीन पोलिस ठाणी…

पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!