
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
नाशिक : अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सतत नवे खुलासे होत आहेत. अशोक खरात याचा वैद्यकीय अहवालही समोर आला आहे. त्यामध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पीडितांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी विविध चाचण्या करण्यात आल्या असून त्यात एचआयव्ही चाचणीचाही समावेश होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरातचा एचआयव्ही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला, तरी गुन्ह्याच्या स्वरूपामुळे तपास अधिकच तीव्र करण्यात आला आहे.
भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस…
पोलिसांच्या तपासात आतापर्यंत १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अनेक पीडित महिला भीतीमुळे समोर येण्यास टाळाटाळ करत असल्याचेही समोर आले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भोंदू अशोक खरात हा व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून संपर्क साधत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्याच्या मोबाईलमधील डेटा सध्या पुनर्प्राप्त (रिकव्हर) करण्याचे काम सुरू असून, काही महत्त्वाचे मेसेज डिलीट करण्यात आले असण्याची शक्यता तपासली जात आहे. एसआयटी पथक, सायबर पोलिस आणि तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईलमधील माहिती पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेतून खरात कोणाच्या नियमित संपर्कात होता, तसेच व्हॉइस टायपिंग किंवा व्हॉइस मेसेजमधून कोणती महत्त्वाची माहिती मिळू शकते, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, अशोक खरात याच्या संपर्कातील व्यक्तींची ओळख पटवून त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. मोबाईल डेटा पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर अनेक संभाषणे आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

