
शिक्षिकेची हृदयद्रावक सुसाईड नोट; तीन महिन्यांच्या चिमुकलीने मुखाग्नी द्यावा अन्…
पाटणा (बिहार): वैशाली जिल्ह्यातील कथरा पोलिस स्टेशन हद्दीतील सेहान गावातील एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेने गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
प्रिया भारती असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्यांच्या मागे तीन महिन्यांची मुलगी आणि पती दीपक राज आहे. त्या शाळेपासून थोड्या अंतरावर भाड्याच्या घरात राहत होत्या. त्याच शाळेतील दुसऱ्या शिक्षिकेसोबत त्यांचा वाद झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. यामध्ये शिक्षिकेने लिहिले की, “आई, बाबा, मला माफ करा! माझा कोणाशीही वाद नाही. मी माझ्या मर्जीने हे जग सोडून जात आहे. माझा मृतदेह रसूलपूरला नेऊ नये. माझे अंतिम संस्कार हाजीपूरमध्येच व्हावे. माझ्या मुलीने मला मुखाग्नी द्यावा, माझ्या पतीने नाही. माझा मोबाईल फोन माझ्या पतीला द्यावा. माझ्या मोबाईल नोट्समध्ये काही मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ मेसेज आहेत, ज्याचा पासवर्ड माझ्या पतीला माहित आहे. मी दुखावलेल्या प्रत्येकाची मी माफी मागते. माझं शवविच्छेदन होऊ नये, अशी पोलिस प्रशासनाला विनंती करते. माझ्या पतीवर किंवा कुटुंबावर कोणताही गुन्हा दाखल करू नये. हे पाऊल माझे वैयक्तिक आहे. आई, भाऊ, तुमची मुलगी हरली आहे. माफ कर आई. साडे पाच लिटर दुधाचे पैसे देणे बाकी आहे, ते माझ्या पर्समध्ये पैसे आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ कठारा पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी हाजीपूरच्या सदर रुग्णालयात पाठवला आणि तपास सुरू केला आहे.
हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…
हृदयद्रावक! आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. लवकर या…
हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…
हृदयद्रावक! बहिण-भावावर एकाचवेळी अंत्यसंस्कार, आई-वडिलांची भेट राहिली अधुरी…

