वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना मोजावी लागणार मोठी किंमत…

मुंबई : वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. सिग्नल तोडणे, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरणे यासारख्या चुका केल्यातर नव्या नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द केला जाऊ शकते. रस्ते सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या नव्या नियमांनुसार, वाहन परवाना रद्द करण्याचा अधिकार आरटीओ किंवा जिल्हा परिवहन कार्यालयाला देण्यात आला आहे. मात्र, परवाना रद्द करण्याआधी संबंधित वाहनचालकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

या नियमाचे अधिकृत नोटिफिकेशन बुधवारी जारी करण्यात आले असून 1 जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता नियम मोडल्यानंतर फक्त दंड भरून मोकळे होता येणार नाही. त्यामुळे वाहनचालकांना लहान-मोठे सर्व वाहतूक नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक ठरणार आहे. एका वर्षाच्या कालावधीत पाच वेळा नियम मोडणाऱ्यांवरच केली जाणार आहे. समजा, एखाद्याने एका वर्षात चार वेळा नियम मोडले आणि पुढील वर्ष सुरू झाले तर मोजणी पुन्हा नव्याने सुरू होईल.

नवीन नियमांमध्ये वाहन चोरी, प्रवाशांवर हल्ला, अपहरण, अतिवेग, ओव्हरलोडिंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे आणि सिग्नल तोडणे यांसारख्या छोट्या चुकांचाही समावेश करण्यात आला आहे. किरकोळ निष्काळजीपणामुळे मोठे अपघात होऊ शकतात हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

FASTag नवीन नियम लागू; दंड टाळण्यासाठी काय करावे? घ्या जाणून…

महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…

वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द अन्…

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!