
Video: पोलिस अधिकाऱ्याचे वर्दीतच अश्लील चाळे, DGP वर निलंबनाची कारवाई…
बंगळुरु : कर्नाटकचे डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. या व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोमवारी (ता. १९) समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. वर्दीतच असलेले डीजीपी कार्यालयात काही महिलांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचे व्हिडिओत दिसते. या प्रकरणात, राव दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी म्हटले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीजीपी रामचंद्र राव यांनी गृहमंत्री जी परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
गृहमंत्री कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर डीजीपी राव यांनी पत्रकारांशी बोलताना व्हिडिओ खोटा आणि मॉर्फ्ड असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, ते याबद्दल वकिलांशी बोलून पुढील कारवाई करतील. मी पण विचार करत आहे की हे कसे आणि कधी झाले आणि कोणी केले. या जगात काहीही होऊ शकते. मला याबद्दल काहीही माहिती नाही. चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, राव यांचे अश्लील वर्तन एका सरकारी अधिकाऱ्यासाठी शोभनीय नाही. यामुळे सरकारची बदनामी झाली आहे. राव यांची वागणूक नियमांचे उल्लंघन करणारी आहे. राज्य सरकार पहिल्या दृष्टिक्षेपात या निष्कर्षावर पोहोचले आहे की, डीजीपी डॉ. के. रामचंद्र राव यांना तात्काळ प्रभावाने तपास सुरु असेपर्यंत निलंबित करणे आवश्यक आहे. निलंबनादरम्यान राव राज्य सरकारच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू शकत नाहीत.
कर्नाटक के DGP के. रामचंद्र राव का महिला के साथ अश्लील हरकत करते वीडियो वायरल कर्नाटक मुख्यमंत्री ने जांच के आदेश दिए #कर्नाटक #IPS pic.twitter.com/83ZLlCzpAi
— Sushant Pandey (Sudarshan News) (@isushant_pandey) January 20, 2026
कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बलकर यांनी सांगितले की, जर कोणी काही चुकीचे केले असेल तर सरकार कारवाई करेल. भाजपचे वरिष्ठ आमदार आणि माजी मंत्री एस. सुरेश कुमार यांनी म्हटले की, पोलिस अधिकाऱ्याचे हे लाजिरवाणे कृत्य माफ करण्यासारखे नाही. राव यांनी असे काम केले आहे ज्यामुळे संपूर्ण पोलिस विभागावर डाग लागला आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्दीत आणि आपल्याच कार्यालयात जे काम केले आहे, त्यामुळे लोक पोलिस विभागाकडेच संशयाच्या नजरेने पाहत आहेत.”
डीजीपी के रामचंद्र राव हे कन्नड चित्रपट अभिनेत्री हर्षवर्धिनी रान्या उर्फ रान्या राव हिचे सावत्र वडील आहेत. रान्या राव सोने तस्करी प्रकरणात बंगळूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. के रामचंद्र राव यांच्यावर आपली सावत्र मुलगी रान्या राव हिला मदत केल्याचे आरोपही लागले होते. सोने तस्करीचे प्रकरण समोर आले, तेव्हा राव कर्नाटक पोलिस हाउसिंग कॉर्पोरेशनचे प्रमुख होते. प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले होते. नंतर राज्य सरकारने तो आदेश रद्द करून राव यांना डीजीपी (नागरी हक्क अंमलबजावणी) बनवले होते. मात्र रान्या रावने तस्करीच्या कामात आपल्या वडिलांच्या सहभागाचा इन्कार केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण डीजीपींच्या कृतीवर टीका करत आहेत, तर काही जण याला षडयंत्र असल्याचेही म्हणत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.
Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…
Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…
पोलिस पत्नीची वर्दी घालून अनेकांना गंडवले; पाहा कारनामे…
Surprise Video! लेक PSI झाल्यानंतर वर्दीतच घरी परतली; असू अन् हसू…

