
तब्बल 50 वर्षांनी लागला 7.65 रुपयांच्या चोरीचा निकाल; न्यायालयाने दिले आदेश…
मुंबई : दोन अज्ञात व्यक्तींवर 7.65 रुपयांची चोरी केल्याचा आरोप होता. या चोरीप्रकरणी दाखल झालेला खटला तब्बल जवळपास पाच दशकांनंतर अखेर न्यायालयीन प्रक्रियेचा शेवट गाठत आहे. 1977 साली नोंदवण्यात आलेल्या या प्रकरणावर माझगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अखेर पडदा टाकला आहे.
या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींवर 7.65 रुपयांची चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या काळात ही रक्कम तुलनेने मोठी मानली जात होती. पोलिसांनी जामीनपात्र नसलेले अटक वॉरंट जारी केले होते, मात्र अनेक वर्षांच्या शोधानंतरही दोन्ही आरोपींचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. परिणामी हा खटला वर्षानुवर्षे केवळ नोंदीपुरताच प्रलंबित राहिला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी 14 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, जवळपास 50 वर्षे उलटूनही या प्रकरणात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. “अशा स्वरूपाचे प्रकरण अनावश्यकपणे प्रलंबित ठेवण्यात कोणताही अर्थ नाही,” असे नमूद करत न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 379 (चोरी) अंतर्गत दाखल असलेला गुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषमुक्त करत, जप्त करण्यात आलेली 7.65 रुपयांची रक्कम तक्रारदाराला परत देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जर तक्रारदार उपलब्ध झाला नाही, तर अपीलची मुदत संपल्यानंतर ती रक्कम सरकारी खात्यात जमा करण्यात येणार आहे. यावेळी न्यायालयाने हेही अधोरेखित केले की, चोरीची रक्कम 2 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याने हा खटला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 260 अंतर्गत ‘संक्षिप्त सुनावणी’स पात्र ठरतो. लहान स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये जलद न्याय देण्यासाठी या तरतुदी करण्यात आल्या असून, अशा प्रकरणांना दीर्घकाळ प्रलंबित ठेवणे योग्य नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…
बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…
न्यायालयाने सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्याला ठोठावला दंड…
मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…

