सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…

सातारा : बरड (ता. फलटण, सातारा) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यांना आफ्रिकेतील दक्षिण सुदान येथे संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी हजारो नागरिकांनी ‘अमर रहे’च्या घोषणा देत या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहिली.

जवान विकास गावडे हे भारतीय लष्करातील ११५- इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नायक या पदावर सेवा बजावत होते. परदेशातील सैन्यांना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शांतीसेना असलेल्या मोहिमेत ते कार्यरत होते. त्यांची नियुक्ती सध्या आफ्रिकेतील दक्षिण सुदान प्रांतात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेसाठी करण्यात आली होती. तिथे आपले कर्तव्य बजावत असताना त्‍यांना वीरमरण आले आहे. जवान गावडे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच फलटण तालुका व त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली होती.
Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

जवान विकास गावडे हे बरड (ता. फलटण) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून, ते २२ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते. पुणे येथे त्यांनी सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. हुतात्मा विकास यांची दोन वर्षांची मुलगी श्रीशाचा वाढदिवस दोन दिवसांवर आला होता. तसेच शांतीसेनेची मोहीम संपवून लवकरच ते मायदेशी परतणार होते आणि 14 जानेवारीला आपल्या घरी येणार होते, मात्र त्या आधीच त्यांना हौतात्म्य आले.

हुतात्मा जवान विकास गावडे यांचे पार्थिव ११ जानेवारी रोजी सुदानमधून विमानाने मुंबईत आणण्यात आले आणि तिथून रस्तेमार्गे त्यांच्या गावी नेण्यात आले. दोन वर्षांची चिमुरडी श्रीशा आपल्या पित्याला पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला. अंत्यसंस्कारावेळी पुणे आणि साताऱ्यातील हजारो नागरिकांनी ‘अमर रहे’च्या घोषणा देत या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहिली.

सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…

जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…

पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…

भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…

Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!