
धक्कादायक! नवऱ्याचे गुप्तांग दाबून संपवलं अन् सकाळी उठल्यानंतर…
हरियाणा: सोनीपत येथील एका विवाह पॅलेसमध्ये कार्यरत असलेल्या केअरटेकर राम किशन यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी सरिता हिनेच पतीचे गुप्तांग दाबून हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे.
सरिताने सोमवारी रात्री पतीकडे ३ हजार रुपयांची मागणी केली होती. राम किशनने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. मात्र, नंतर दोघांनी एकत्र जेवण केले आणि झोपायला गेले. सरिताने रात्रीच्या सुमारास पतीच्या चेहऱ्यावर उशी दाबून ठेवली आणि त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. या घटनेनंतर सरिता सकाळी नेहमीप्रमाणे उठली. चहा प्यायली, नाश्ता केला आणि सासू रुक्मिणी यांना “तो आज उशिरा उठेल” असे सांगत दोन मुलांना घेऊन घरातून निघून गेली. मात्र मोठा मुलगा कुणाल (वय १२) याला तिने तिथेच सोडले.

काही वेळाने रुक्मिणी यांनी नातवाला राम किशनला उठवण्यासाठी पाठवले. मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने त्या स्वतः खोलीत गेल्या असता राम किशन मृतावस्थेत आढळून आला. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, राम किशन आणि सरिता यांचे लग्न १३ वर्षांपूर्वी झाले होते. राम किशन व्यवसायाने ड्रायव्हर होता. दाम्पत्याला तीन मुलगे आहेत. सरिता फॅशनेबल असल्याने राम किशन तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. ही हत्या अनैतिक संबंधातून की आर्थिक लोभातून झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सरितासह सतपाल नावाच्या व्यक्तीचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. मात्र, त्याची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिस सर्व शक्य बाजूंनी तपास करत असून, लवकरच सत्य समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…
कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगाचा घेतला चावा…
संतापजनक! पत्नीच्या गुप्तांगाला हळदी-कुंकू लावत पिळले लिंबू…
सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…

