पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

पुणे : हिंजवडीच्या दिशेने येत असताना महामार्गावर स्कूटीला भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे या अपघातात युवतीचा मृत्यू झाला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.

तन्वी साखरे (वय 20, रा. हिंजवडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. तन्वी ही तिच्या वडीलांसोबत दुचाकीवरुन पुनावळेकडून हिंजवडीच्या दिशेने चालली होती. तन्वीचे वडील दुचाकी चालवत होते आणि ती पाठी बसली होती. दरम्यान, हिंजवडीच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात वडिलांच्या डोळ्यादेखत तन्वीचा जागीच मृत्यू झाला. तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

दरम्यान, अपघातानंतर डंपरच्या चालकाने घटना स्थळावरुन पळ काढला होता. मात्र, हिंजवडी पोलिसांनी चालक अजय अंकुश ढाकणे (वय २२, रा. जांबे) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. हिंजवडी परिसरात अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये अवजड वाहनांबद्दल दहशत निर्माण झाली आहे.

पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…

Video: पुणे शहरात सिमेंट मिक्सर खाली चिरडून मुलीचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!