मोठी बातमी! डॉक्टरच्या घरातून ३०० किलो RDX, AK-४७ रायफल, शस्त्रसाठा जप्त…

नवी दिल्ली: हरियाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) एके-४७ रायफल आणि जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. आदिल अहमद असे डॉक्टरचे नाव आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून त्याला अटक केली. आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे कबूल केले आहे. आदिल पूर्वी अनंतनागमधील जनरल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. त्याने २०२४ मध्ये तिथून राजीनामा दिला आणि त्यानंतर सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. डॉ. आदिल अहमदने तीन महिन्यांपूर्वी फरीदाबादमध्ये एक खोली भाड्याने घेतली. आरोपी डॉक्टर तिथे राहत नव्हता. त्याने फक्त त्याचे साहित्य ठेवण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती.

पोलिसांनी खोलीतून १४ बॅगा जप्त केल्या, ज्यामध्ये ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल, ५ ​​लिटर रसायने, ८४ काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तूल होते. जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांशी संबंध असल्याचे तपासले जात आहे.

दोन डॉक्टर, आदिल अहमद राथेर (रहिवासी अनंतनाग) आणि मुझम्मिल शकील (रहिवासी पुलवामा) यांना सहारनपूर आणि फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे, तर तिसरा डॉक्टर अजूनही फरार आहे. हे डॉक्टर दहशतवादी संघटना अंसार गजवत-उल-हिंद शी संबधित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गोंदिया पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन रावबून केला शस्त्रसाठा जप्त…

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

राजकीय नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा; मिळाल्या धक्कादायक वस्तू…

पुण्यात ‘एनआयए’कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक…

नगरमध्ये मोठ्या शस्त्रसाठ्यासह 9 काश्मिरी युवकांना अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!