धक्कादायक! भावाला मारलं अन् गर्भवती वहिनीवर केला बलात्कार…

अहमदाबाद (गुजरात) : एका १५ वर्षीय मुलाने प्रथम त्याच्या मोठ्या भावाला मारहाण ठार मारले आणि नंतर त्याच्या घाबरलेल्या गर्भवती वहिनीवर बलात्कार करून तिचाही निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुनागढ शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये राहणाऱ्या मृत महिलेच्या पालकांनी विसावदर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा हा खून उघडकीस आला आहे. आरोपी मुलगा एका डेअरीमध्ये काम करत होता. मोठ्या भावाने पैसे घेतल्यामुळे आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासादरम्यान पोलिसांना सांगितले. भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारले आणि तो मरेपर्यंत मारत राहिला. जेव्हा त्याच्या वहिनीने तिच्या पतीचा खून करणाऱ्या दिराचे हे रूप पाहिले तेव्हा ती घाबरली. तिने त्याच्या जीव वाचवण्यासाठी विनवणी केली. त्यानंतर दिराने सांगितले की जर तिने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले तर तो तिला सोडून देईल. ती सहा महिन्यांची गर्भवती असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण, नंतर त्याला वाटले की ती सर्व घटना लोकांना सांगेल आणि त्याचं सत्य उघडकीस आणेल. त्याने तिच्या पोटात गुडघ्याने वार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. त्याने तिच्या पोटावर इतक्या क्रूरपणे वार केले की तिच्या पोटातील भ्रूण गर्भाशयातून बाहेर पडले.

पोलिसांनी मुलाच्या आईलाही अटक केली आहे, जिने तिच्या धाकट्या मुलाला मृतदेह पुरण्यास मदत केली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले तेव्हा ते नग्न होते. पुरूष पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर महिलेच्या अंगावरतीही कपडे नव्हते. तिची प्रसूती झाली होती. मृतदेह पाच फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आले होते आणि कपडे जाळण्यात आले होते. गुन्ह्याच्या वेळी आरोपीची आई देखील उपस्थित होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीने त्याच्या वहिनीवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…

दीराने वहिनीच्या बहिणींना पाठवले नको ते मेसेज अन् पुढे तर…

वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…

धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!