लातूर! फ्रेशर्स पार्टीत डान्स करताना एकमेकांना धक्का लागला अन् जीव गेला…

लातूर: फ्रेशर्स पार्टीत डान्स करत असताना धक्का लागल्याच्या कारणातून एका महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लातूर येथील जीवनरेखा महाविद्यालयात ही घटना घडली. सुरज धोंडीराम शिंदे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो लातूर शहरातील जीवनरेखा महाविद्यालयात डीएमएलटीचे शिक्षण घेत होता. अलीकडेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘फ्रेशर्स पार्टी’चे आयोजन केले होते. याच पार्टीत सुरज धोंडीराम शिंदे (रा. प्रगती नगर, लातूर) सहभागी झाला होता. फ्रेशर्स पार्टीत डान्स करत असताना मयत सूरज आणि आरोपींचा एकमेकांना धक्का लागला. यावरून दोन गटात वाद सुरू झाला. याचवेळी रिहान शेख आणि इरफान पठाण (दोघेही रा. चौधरी नगर, लातूर) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर दोघेजण यांनी जुन्या वादाची कुरापत काढून सुरज शिंदे आणि त्याच्या मित्राला काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सुरज शिंदे गंभीररित्या जखमी झाला. मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला होता.

सुरजवर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सुरजचा मित्र आदित्य याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये रिहान शेख आणि इरफान पठाण यांच्यासह इतर दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

लातूर! प्रियकरासोबत केला लॉजवर प्लॅन अन् पती दिसताच…

लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

लातूर! सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं, खुनी निघाला…

धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…

लातूरमध्ये जन्मदात्या आईवर कोयत्याने केले तब्बल 75 वार अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!