विषारी खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला केली अटक; 24 चिमुकल्यांचा मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश): सर्दी कमी करणारे खोकला सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी रात्री तामिळनाडूतील चेन्नईत छापा टाकत रंगनाथनच्या मुसक्या आवळल्या. एसआयटीने कंपनीकडून महत्त्वाची कागदपत्रे, औषधांचे नमुने आणि उत्पादन रेकॉर्ड देखील जप्त केले आहेत.

रंगनाथन पत्नीसह फरार झाला होता. चेन्नईमध्ये, चेन्नई-बेंगळुरू महामार्गावरील रंगनाथनचे 2000 चौरस फूट क्षेत्रफळाचे अपार्टमेंट सील करण्यात आले, तर कोडंबक्कममधील नोंदणीकृत कार्यालय बंद आढळले. पोलिसांनी गोविंदन रंगनाथन याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

खोकला सिरप प्राशन केल्यानंतर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या 24 वर पोहोचली आहे. कोल्ड्रिफ सिरपच्या चौकशीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. तामिळनाडूच्या ड्रग्ज कंट्रोल डायरेक्टरच्या अहवालात हे सिरप नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवल्याचे उघड झाले आहे. तपासणीदरम्यान, कंपनीच्या मालकाने तोंडी कबूल केले की त्याने दोन हप्त्यांमध्ये प्रोपीलीन ग्लायकॉलच्या 50 किलोच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या. याचा अर्थ कंपनीने 100 किलो विषारी केमिकल खरेदी केले होते.

औषध ​​कंपनीने निकृष्ट दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले. त्याची कधीही चाचणी करण्यात आली नाही. धक्कादायक म्हणजे, कंपनीकडे खरेदीचे बिल किंवा वापरलेल्या केमिकल्सचे रेकॉर्ड नाही. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये असेही आढळून आले की या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) सारखी विषारी रसायने परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा 486 पट जास्त प्रमाणात होती. एका तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की हे प्रमाण केवळ मुलांसाठी घातक नाही तर हत्तीच्या आकाराच्या प्राण्यांच्या मूत्रपिंड आणि मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकते.

तपास अहवालानुसार, कंपनीने 25 मार्च 2025 रोजी चेन्नईतील सनराइज बायोटेककडून प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले होते. ते नॉन-फार्मास्युटिकल ग्रेडचे होते, म्हणजेच ते औषधे बनवण्यासाठी योग्य नव्हते. असे असूनही, कंपनीने त्याची शुद्धता तपासली नाही किंवा त्यात डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण तपासले नाही.

नवरा साखरझोपेत असताना अंगावर ओतलं उकळतं तेल अन् जखमांवर टाकला मसाला…

‘झुंड’ हिंदी चित्रपटातील कलाकार बाबू छत्री याची हत्या…

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…

Video: घटस्फोटानंतर दूधाने स्नान अन् जंगी सेलिब्रेशन…

Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Makeupartist (@hankare.shweta)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!