नाशिक! अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करताच बसला धक्का; नराधम निघाला…

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार केला असून, मुलगी (वय १७) गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना घडली असून, नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर येथील राहणाऱ्या चाळीस वर्षीय बापाकडून त्याच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिची तपासणी केली असता ती मुलगी आठ आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली, घटनेचे गांभीर्य ओळखून गंगापूर पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. सखोल तपासणी सुरू केली असता शंभरपेक्षा जास्त संबंधित लोकांची चौकशी केली. मात्र, पीडित मुलीची आई गेल्या दीड महिन्यापासून घरी नसल्याची माहिती समोर आली तर, वडील दिवसभर कामावर असत आणि रात्री उशिरा घरी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अतिसंवेदनशील प्रकरणात वडिलांचा DNA तपासल्यानंतर मुलीवर तिच्या पित्याकडूनच अतिप्रसंग झाल्याने मुलगी आठ आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गंगापूर पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे.

पीडित मुलगी ही नाशिक येथे पित्यासोबत राहत होती, तर तिची आई ही वारंवार तिच्या मूळगावी जात होती. यामुळे दोन्ही पथकांना सरतेशेवटी पीडितेच्या वडिलांवर संशय आला. तिच्या वडिलांचे डीएनए नमुने संकलित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले. तपासणीमध्ये वडिलांनी पीडितेवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ‘डीएनए’ नमुने घेतल्यानंतर पीडितेचा बाप हा राहत्या परिसरातून फरार झाला होता. त्याने त्याचा वापरातील मोबाइल हा घरीच ठेवून पळ काढल्याने त्याचे ‘लोकेशन’ शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते. तांत्रिक विश्लेषण करत सीबीएस भागात ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…

धक्कादायक! मठात राहणारी अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर…

सख्ख्या भावासह मामाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; राहिली गरोदर…

नोकरी वाचवायची असेल तर मला खूश ठेव म्हणाला अन् गरोदर राहिल्यावर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!