
पुणे! नवऱ्याच्या प्रेयसीला पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले अन्…
पुणे: एका महिलेनं पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. त्यानंतर तिला कारमध्ये दोन ते अडीच तास फिरवून बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता विप्रो सर्कल येथे होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फोन केला. ‘तुमचे पार्सल द्यायचे आहे,’ असे सांगून तिला ऑफिसच्या बाहेर बोलावले. ती बाहेर आल्यावर एका कारमध्ये बसलेल्या प्रियकराची पत्नी, तिची आई आणि भावाने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला ताथवडे, वाकड अशा विविध ठिकाणी फिरवत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
महिलेच्या अपहरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी शोध सुरू केला. हिंजवडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पीडित महिलेचे अपहरण झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कारचा क्रमांक शोधून काढला आणि ती नेमकी कुठे आहे याचा माग घेतला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी महिलेसह तिच्या आई आणि भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
पुणे! दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांची तत्परता अन् कुटुंब आले एकत्र…
पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…
पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

