
Video: पुणे शहरात सिमेंट मिक्सर खाली चिरडून मुलीचा मृत्यू…
पुणे: हिंजवडी परिसरात रस्त्यावरून जड वाहनांना मनाई असताना, बेदरकारपणे सिमेंट मिक्सर चालवून झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
प्रत्युषा संतोष बोराटे (वय 11) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, वैशाली बोराटे (वय 35) या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी सागर सुभाष आगलावे (रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी बुधवारी (ता. 13 ऑगस्ट) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मिक्सर ट्रकचालक फरहान मुन्नू शेख (वय 25, रा. वाकड) याला अटक केली.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
अपघाताची घटना मंगळवारी (ता. 12 ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी, फेज 2 येथील इन्फोसिस सर्कलजवळ घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही सुद्धा आता समोर आला आहे. या सीसीटीव्ही दृश्यात दुचाकीला धडक दिल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी मुलीच्या काकाने हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख याला अटक केली आहे. हिंजवडी परिसरात सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या कालावधीत अवजड वाहनांना वाहतूक करण्यास मनाई असताना सुद्धा भरधाव वेगात फरहान शेखने मिक्सर ट्रक चालवला होता. या बाबतचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.
अपघाताच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला चिरडून सिमेंट मिक्सर पुढे जाताना दिसत आहे. तो सिमेंट मिक्सर मायलेकींना चिरडून पुढे जातो, काही वेळात ही गंभीर घटना सर्वांना समजली, या घटनेमध्ये 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिमेंट मिक्सर खाली चिरडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद#Crimenews #Punenews #Accidentnews pic.twitter.com/Gh47YUJQIA
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 19, 2025
पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…
पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

