साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…

छत्रपती संभाजीनगर : वेरुळच्या घाटातून कारने प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांची कार अडवून कुटुंबावर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. शिवाय, कारमधील लग्न ठरलेल्या युवतीचे अपहरण केले. तिला जबरदस्तीने गाडीत बसवून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात कारचालकासह चार वर्षांचा लहान मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण झालेल्या युवतीचा रविवारी (ता. १३) साखरपुडा झाला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून हे कुटुंब पुन्हा आपल्या गावी परत चालले होते. पण वाटेत असणाऱ्या वेरुळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ तीन अज्ञातांनी या कुटुंबीयांची कार अडवली आणि कुटुंबावर हल्ला करत नियोजित वधूचे अपहरण केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मोहाडी उपनगरातील एक कुटुंब आपल्या मुलाच्या साखरपुड्यासाठी रविवारी छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरात गेले होते. दुपारी साखरपुडा पार पडल्यावर विवाह ठरवलेल्या वधूसह हे कुटुंब रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते. दरम्यान, रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास वेरूळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ अज्ञात तिघांनी त्यांच्या वाहनास (एमएच १८ बीआर २५१८) अडवून तलवार व कोयत्यांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी वाहनाच्या काचा फोडल्या. या वाहनात चार महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुले होती. हल्लेखोरांनी नियोजित वधूला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…

नवविवाहित युवतीला म्हणाले, तू तुझ्या बापाकडून 20 लाख रुपये घेऊन ये…

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर…

फेसबुकवरील महिलेच्या मैत्रीमुळे गेला अधिकाऱ्याचा जीव…

 

View this post on Instagram

 

A post shared by pranita Chate (@p_c_makeover_)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!