हृदयद्रावक! नविवाहित युवतीने घेतला जगाचा निरोप; व्हॉट्सअॅपवर म्हटले की…

चेन्नई (तमिळनाडू): हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहित युवतीने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तिरुपूर येथे घडली आहे. दोन महिन्यांपूर्वीच युवतीचा विवाह झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखले केला असून, पुढील तपास करत आहेत.

रिधान्या (वय २७) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहीत युवतीचे नाव आहे. कीटकनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळली. कपड्याची कंपनी चालवणाऱ्या अन्नादुराई यांची मुलगी रिधान्या हिचा एप्रिलमध्ये कविनकुमारशी विवाह झाला होता. अन्नादुराई यांनी मुलीच्या लग्नात मोठा खर्च केला होता. ८० तोळे सोने ७० लाख रुपये किमतीची व्होल्वो कार भेट म्हणून दिली होती.

लग्नाच्या दोनच महिन्यांमध्ये रिधान्याच्या सासरच्यांनी हुंड्यावरून तिचा मानसिक आणि पतीने शारीरिक छळ करायला सुरुवात केली. छळ सहन न झाल्याने मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली आणि तिने गाडीत कीटकनाशक खाऊन आत्महत्या केली. रिधान्या मोंडीपलयम येथील मंदिरात जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. वाटेत तिने गाडी थांबवली आणि कीटकनाशकांच्या गोळ्या खाल्ल्या. गाडी बराच वेळ एकाच ठिकाणी उभी असल्याचे पाहून नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस गाडीची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा त्यांना रिधान्या आत मृतावस्थेत आढळली आणि तिच्या तोंडातून फेस येत होता.

पोलिसांनी तिला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तिचे कुटुंबिय रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपी पती कविन कुमार, त्याचे वडील ईश्वर मूर्ती आणि आई चित्रा देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रिधान्या हिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या वडिलांची माफी मागत सात व्हॉट्सअॅप ऑडिओ मेसेज पाठवले होते. मी आता हुंड्यासाठी होणारा छळ सहन करू शकत नाही. हे लग्न एका कटाचा भाग होता. मी आता रोजचा छळ सहन करू शकत नाही. लोक मला तडजोड करण्यास सांगतात, माझे दुःख कोणीही समजत नाही. तुम्हालाही वाटत असेल की मी खोटे बोलत आहे, पण तसे नाही. सगळे ढोंग करत आहेत आणि मला माहित नाही की मी काहीही का करू शकत नाही. पण मला आयुष्यभर तुमच्यावर ओझे व्हायचे नाही. यावेळी मी कोणतीही चूक केली नाही. मला हे जगणं आवडत नाहीये,” असे रिधान्या हिने म्हटले होते.

वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…

शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा…

नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेत संपवली जीवन यात्रा…

नवविवाहितेने दाजिला शेवटचा मेसेज करून घेतला जगाचा निरोप…

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

नवविवाहितेने हाताच्या तळव्यावर कारण लिहून केली आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!