पुणे पोलिसांची गुटखा व सिगारेट विकणाऱ्यांवर बेधडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): किरणा दुकानामध्ये गुटखा व सिगारेट विकणाऱ्यांवर आंबेगाव पोलिस स्टेशनने बेधडक कारवाई केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हददीत २५/०६/२०२५ रोजी आंबेगाव ब्रु, व कात्रज भागात पुणे या ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात व टपरीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला आर. एम. डी, विमल पान मसाला गुटखा विक्रीसाठी साठा करुन ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी आंबेगाव पोलिस स्टेशन हददीत ४ ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली. सदर कारवाई दरम्यान एकूण ४९,९००/- रुपये किंमतीचा गुटखा व सिगारेट जप्त करण्यात आला.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

सदर कारवाईत मालाची विक्री करणेकरीता साठा करून ठेवणारे १) राहुल प्रकाश संचेती, वय ३२ वर्षे, २) प्रमोद प्रकाश संचेती, वय ३६ वर्षे, ३) रविंद्र राजकुमार वाकडे, वय २६ वर्षे, ४) सुनिल दगडू सुरवसे, वय २४ वर्षे, ५) प्रशांत बच्चा कुलाल, वय ४१ वर्षे, यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द आंबेगांव पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. १३२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ), २६ (२) (१), २६ (२) (४) अंतर्गत कलम ५९, जाहिरातीस प्रतिबंध आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा अधिनियम २००३ चे कलम ७ ( २ ), २० ( २ ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, मा. राजेश बनसोडे, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे, श्री. राहुल आवारे, सहाय्यक पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलिस निरीक्षक गुन्हे श्री गजानन चोरमले, तपास पथकाचे पोलिस उप-निरीक्षक मोहन कळमकर, पोलिस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासो पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, अविनाश रेवे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहर पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…

पुणे! तलाठी अन् युवतीच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…

पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…

पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…

पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…

पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!