हृदयद्रावक! शेतामध्ये शॉक बसून पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू…

जालना : शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विनोद मस्के असे वडिलांचे नाव असून मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जालना तालुक्यातील वरुड गावात शेतकाम करत असताना वडिलांना विद्युत तारेचा जोरदार शॉक बसला. त्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांना तिघांनाही तात्काळ जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. सध्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे वरुड गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हृदयद्रावक! इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीचा तडफडून मृत्यू…

हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

हृदयद्रावक! कुटुंबातील सात जणांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप; कारण…

हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!