
पुणे शहरात शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार…
पुणे: पुणे शहरातील शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या कारवर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळी झाडली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com
शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे हे वारजे माळवाडी येथील गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते, त्याचवेळी बाहेर उभी केलेल्या त्यांच्या गाडीवरती गोळीबार करत हल्ला झाला. गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोरांनी तात्काळ दुचाकीवरून पलायन केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा गोळीबार धमकावण्यासाठी करण्यात आला का, याचे वैमनस्यातून कारणातून गोळीबार झाला का, आदी विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांचे गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. सोमवारी घारे हे आपल्या कार्यालयात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळबार केला. सुदैवाने घारे त्यांच्या गाडीमध्ये नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान पुणे शहर परिसरात सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत पसरवणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत, अशा घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…
पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

