Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला असून, 13 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी-विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसत आहे.

दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी संपूर्ण योजना आखली होती. पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी ते कोणत्या धर्माचे आहेत अशी विचारणा केली. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांना तर पँट काढायला सांगितली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. मात्र, हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. लष्कराने पहलगाम मध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहे. फॉरेन्सिक टीम त्यांच्यासोबत आहे. जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा मागमूस काढला जात आहे. लष्कराचे जवान हे ड्रोन चा वापर करत शोध घेत असून, भारतीय लष्कराने LH हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. सर्च ऑपरेशन साठी लष्कर या हेलिकॉप्टर चा वापर करत आहे.

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!